# ।।श्रीसद्गुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज।। > श्री आळंदीचे स्वामी ## Pages - [श्री गुरु पद्मनाभस्वामी कार्यक्रम](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae/): श्री सद्गुरु पद्मनाभस्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव श्री सद्गुरु पद्मनाभस्वामी उर्फ श्री नारायणबुवा यांची ११४ वी पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा झाला. दिनांक २३.०४.२०१५ ते शुक्रवार दिनांक ०१.०५.२०१५ या काळात हा महोत्सव साजरा झाला. दि. २३.०४.२०१५ पासून सकाळी ६.०० वा. काकडारती, त्यानंतर श्रींच्या समाधीस पंचामृत अभिषेक आणि नंतर मंगलारती. ठीक ९.३० वा. श्री गुरुचरित्र पारायण, ११.३० वा. आरती आणि नैव्यद्य, दुपारी ३. ३० वा. गीत गोविंद (अष्टपदी), ४.३० वा. महिलांचे भजन, ६.१५ वा. श्रींची सायं आरती, स्तोत्रे. ठीक ९.३० वा. पुरुषांची भजने असा दैनंदिन कार्यक्रम दि. २९ तारखेपर्यंत होता. दि. ३० रोजी श्रींच्या पुण्यातीथीचा दिवस सकाळी पंचामृत स्नान, लघुरुद्राभिषेक, ठीक ११.३० वा.  … Read more - [श्री गुरु पद्मनाभस्वामी महाराजांची फोटोगॅलरी](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%b0%e0%a5%80/): वैशाख शुद्ध द्वादशी श्री पद्मनाभस्वामी १२५ वी पुण्यतिथी. श्री पद्मनाभस्वामी समाधी मंदिर धुळे. श्री पद्मनाभस्वामी समाधी मंदिर धुळे येथे सध्या स्वामींची १२५ वी पुण्यतिथी साजरी होते आहे. त्या निमित्त झालेल्या हरिपाठ आणि भजनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष सोहळा. श्री पद्मनाभस्वामी महाराज यांच्या चरित्राचा प्रकाशन समारंभ. धुळे मठ. - [महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चरित्र](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a8/%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/) - [श्री अण्णासाहेब पटवर्धनांची आरती व स्तोत्रे](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a8/%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87/): ॥श्री॥ जयदेवा योगेश्वरा । विनायका गुरुवरा ॥ आरती ओवाळीतो । प्रेमाच्या माहेरा ॥धृ॰॥ लोपला वेदमार्ग । लया ब्राह्मण्य गेलें ॥ सोडुनी स्वाभिमान । परबुद्धि झाले जन ॥१॥ हीन दीन दशा आली । दुजी आशाच नुरली ॥ देवाच्या कृपेंवीण । दैवहीनां नुमजें तें ॥२॥ जाणुनी पुण्यग्रामीं । महाराष्ट्र पुण्यभूमी ॥ ब्राह्मण्य मूर्तिमंत । दावियेलें आचरोनी ॥३॥ गायत्रीमंत्रराज । व्यक्त दाखवीलें बीज ॥ जीव हा विश्वकाय । स्वयं ब्रह्मचि केवळ ॥४॥ परमात्मा गुरुमूर्ति । नरसिंहसरस्वती ॥ सच्छिष्य रहाटीनें । प्रार्थिलें जन्मवरीं ॥५॥ सकळां अंतर्यामीं । पूर्ण प्रगट व्हावें ॥ हीनती सर्व जावीं । इहपर मुक्तीसी द्यावें ॥६॥ - [श्री अण्णासाहेब पटवर्धनांची फोटोगॅलरी / विडीयो](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a8/%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8b-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%af%e0%a5%8b/): विडीयो फोटोगॅलरी - [श्री अण्णासाहेब पटवर्धन](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a8/): आळंदी देवस्थानातर्फे ॥श्रीस्वात्मसौख्य॥ हा ग्रंथ भाष्यासह श्री अप्रबुद्धांनी प्रसिद्ध केला. यावेळी श्री बुवामहाराज (श्री गोडबोलेबुवा महाराज) हे प्रमुख मठाधीश होते. श्री बुवामहाराज आणि अप्रबुद्ध हे दोघेही श्री अण्णासाहेबांच्या तालिमित लहानाचे मोठे झाले, साधना मार्गावर चालू लागले आणि अण्णासाहेबांनी दाखवून दिलेल्या पद्धतीनुसार त्यांनी श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांची जन्मभर उपासना केली. या उपासनेचे प्रमुख अंग अथर्वशीर्ष असे. अथर्वशीर्षाचे किती तरी पाठ त्यांनी केले असे म्हणण्यापेक्षा अथर्वशीर्षाने कोणतेही कार्य, कोणताही संकल्प हे दोघेही करीत. कारण अथर्वशीर्षहे गणेश उपनिषद आहे आणि वेदांमध्ये त्याचे गायन ऋषिमुनींनी प्राचीन काळापासून केलेले आहे. या सर्व ऋषिमुनींनी या ब्रह्मणस्पती सूक्ताचा जो वैदिक घोष युगानुयुगे केला त्याचे एक रम्यरूप श्रीगुरु  … Read more - [श्री गुरु पद्मनाभस्वामी महाराज](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/): श्रीगुरु चरित्राच्या ४ थ्या अध्यायात ब्रह्मा, विष्णु, महेश हे तिन्ही दत्तात्रेयरूपाने प्रकट झाले असा हा सर्व कथाभाग आला आहे. त्यामधील ब्रह्मदेव आणि शिव हे आपापल्या लोकाला गेले आणि विष्णु मात्र दत्तात्रेय-रूपाने अत्रि ऋषींच्या आश्रमात राहिले. विष्णु हे दत्तात्रेयाच्या त्रयमूर्तिरूपातील असे मध्यवर्ती रूप आहे की जो कोणी दत्तात्रेयाचे दर्शन घेतो त्याला दत्तात्रेयाच्या विष्णुरूपाचे दर्शन होते. हा भगवान दत्तात्रेय विष्णु विठ्ठलरूपाने पंढरपूरी, ज्ञानेश्वररूपाने आळंदीला आणि नरसिंव्हसरस्वती रूपाने इंद्रायणी तीरावर आला. आळंदी हे सिद्धेश्वराचे क्षेत्र आहे आणि या शैव क्षेत्रामध्ये विष्णूची ही दोन रूपे श्री ज्ञानेश्वर आणि श्री नरसिंव्हसरस्वती योग समाधिस्थ रूपामध्ये विराजमान आहेत. ज्ञानदेवांनी जेव्हा संजीवन समाधि घेतली तेव्हा तिथे साक्षात् विठ्ठल-रुक्मिणी  … Read more - [प्रभावळ](https://www.alandicheswami.org/%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3/): राधाकृष्ण स्वामींचे वडील तुळजोपंत कुळकर्णी हे सुमारे २५०-३०० वर्षांपूर्वी कोल्हापूरकडील चिकुरडे या गांवी राहत असत. बद्रीकेदार ते रामेश्वर आणि रामेश्वर ते काशी-प्रयाग अशा तीर्थयात्रा केल्यावर तुळजोपंतांनी प्रयागहून अक्षय-वटाची एक फांदी आणून कृष्णा वेण्णा संगमा वरील तीरावर लावली आणि तिथेच ते तपाचरण करीत राहिले. शाहू महाराज प्रतिनिधीबरोबर मकरसंक्रांतीच्या पर्वकाळात संगमावर स्नानास आले, त्या वेळी संगमावरील अरण्याचे दान त्यांनी प्रतिनिधीला दिले. संगमावर प्रयागसारखे क्षेत्र व्हावे या इच्छेने प्रतिनिधींनी तेथे एक घर बांधले आणि ते तपश्चर्या करणाऱ्या तुळजोपंतांना दिले. तुळजोपंतांना त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावयास लावले. तुळजोपंतांच्या मुखी नेहमी शिवनाम असे म्हणून यांचे उपनाव ‘शिवनामे’ असे पडले. तुळजोपंतांच्या वंशात पुढे बाळकृष्ण उर्फ बापू, पत्नी  … Read more - [श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांची फोटोगॅलरी/ विडीयो](https://www.alandicheswami.org/%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%b0%e0%a5%80/) - [संपर्क](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95/): श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज संस्थान मठ, गोपाळपुरा, आळंदी देवाची, जिल्हा-पुणे – ४१२१०५ +91-9146136141 info@alandicheswami.org - [ऑडीयो](https://www.alandicheswami.org/%e0%a4%91%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%af%e0%a5%8b/) - [स्वात्मसौख्य](https://www.alandicheswami.org/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af/): स्वात्मसौख्य – प्रस्तावना प्रस्तावना श्री स्वात्मसौख्य हा एक ग्रंथ अद्भुत ग्रंथ आहे. स्वात्मसौख्य = स्व + आत्मा + सौख्य ‘ स्व ‘ म्हणजे ‘ उ ‘ आणि ‘ अ ‘ यांच्या पलीकडील ‘ जीव ” कित्येक संस्कृत शब्दांत असा ‘ स ‘ न अर्थी असतो. उ० ‘ स्मृ ‘ मूळ ‘ ऋ ‘ धातू गत्यर्थ आहे. मनुष्याची सारी वाणी उच्चारली जाते ती कंठापासून तो ओठापर्यतच्या भागांत. ‘ म ‘ काराचा उच्चार करतांना ओठ मिटले जातात आणि वाणीची समाप्ति होते म्हणून ‘ म ‘ शब्द समाप्ति किंवा शेवट यांचा द्योतक आहे. मृत्यूने सर्व हालचाल बंद होते, म्हणून ‘ मृ ‘ शब्दाला  … Read more - [ग्रंथ संपदा](https://www.alandicheswami.org/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%87/): [dflip id=”427″ type=”button”][/dflip] [dflip id=”419″ type=”button”][/dflip] [dflip id=”399″ type=”button”][/dflip] [dflip id=”401″ type=”button”][/dflip] [dflip id=”405″ type=”button”][/dflip] [dflip id=”410″ type=”button”][/dflip] [dflip id=”411″ type=”button”][/dflip] [dflip id=”412″ type=”button”][/dflip] [dflip id=”413″ type=”button”][/dflip] - [श्री महाराजांचे भ्रमण](https://www.alandicheswami.org/%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a3/): पौष पौर्णिमा, शके १९३७, शनिवार दि. २३ जानेवारी २०१६ “श्रीगुरु चरित्र” आणि “आळंदीचे स्वामी” ह्या ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांनी ज्या ज्या गावांना आपल्या चरणस्पर्शांनी व आपल्या कार्याने पूनित केले त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ते पवित्र स्थान पहावे व त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करावा असे श्री सद्गुरूंच्या इच्छेने मनात आले. त्याप्रमाणे आज सकाळी आम्ही श्रींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र कारंजा, जिल्हा वाशिम या पवित्र स्थानापासून श्रींच्या आशीर्वादाने सुरूवात केली. पौष कृ. १, शके १९३७, रविवार दि. २४ जानेवारी, २०१६ श्रींचा जन्म ज्या वाड्यात झाला तो वाडा आता श्री घुडे ह्यांच्या मालकीचा आहे. त्यांचे वंशज श्री प्रकाश घुडे ह्या ठिकाणी  … Read more - [श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांची आरती व स्तोत्रे](https://www.alandicheswami.org/%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/): आरती श्री नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांची आरती जयदेवा गुरुमूर्ती । नरसिंव्हसरस्वती ॥ यतिवर्या दिनोद्धारा । ओवाळू मंगलारती ॥धृ.॥ मायागुणनियामका । परमात्मया व्यापका । सच्चिदानंदकंदा । अद्वया स्वयंप्रकाशका ॥१॥ गुरु क्षराक्षरातीत । आत्माराम तू निश्र्चित ॥ विश्व हा विलास तुझा । ऐसें श्रुतीप्रणीत ॥२॥ ब्रह्मा हरि महेशा । नुमगसी तूं परेशा ॥ वेदशेषा मौन पडे । वर्णिता तव येशा ॥३॥ जगदुद्धारासाठी । अवतरसी या सृष्टीं ॥ अनन्य शरणागता । तारिसी कृपादृष्टी ॥४॥ बालोन्मत जड । स्थिति दाविसी उघड ॥ विदेहपणे विचरसी । निजरूपी अखंड ॥५॥ भक्ति ज्ञान वैराग्य। स्वीकारीसी शांतियोग ॥ भाविका बोध करिसी । हरिभक्ति महद्भाग्य॥६॥ राधाकृष्णस्वामीकृपें । भेटी देसी यतिरूपें ।  … Read more - [श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज](https://www.alandicheswami.org/%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/): आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर जवळच गोपाळपुऱ्यात श्री नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचे समाधि मंदिर आहे. पौष शु. १५ शके १८०७ मध्ये (इ.स. २० जाने.१८८६) श्री नरसिंव्हसरस्वती- स्वामी महाराजांनी येथे समाधि घेतली. ही समाधि योगशास्त्रानुसार आहे. फार प्राचीन काळापासून आळंदी हे स्थान एक प्रख्यात शैव स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सिद्धेश्वराचे शिव मंदिर असून इंद्रायणी नदीवरील सिद्ध बेटात ८४ सिद्धांची स्थाने आहेत. येथे इंद्रायणी उत्तरवाहिनी झाली असून या उत्तरवाहिनी झालेल्या इंद्रायणीच्या तीरावर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज यांचे समाधिस्थान आहे. जेव्हा नदी उत्तरवाहिनी होते तेव्हा त्या नदीला गंगेचे पावित्र्य लाभते आणि योग परंपरा असे मानते की उत्तरवाहिनी असलेली नदी व  … Read more - [गृह](https://www.alandicheswami.org/) ## Optional - [Agent (MCP protocol)](websites-agents.hostinger.com/www.alandicheswami.org/mcp) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)